श्री विनायक बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था , दिग्रस द्वारा संचलित
शिवरामजी मोघे
कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
केळापूर ( पांढरकवडा ), जि. यवतमाळ - ४४५३०२

सचिवांचे मनोगत

आदिवासी बहुल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे आणि शैक्षणिक विकासासह त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या जाणीवेतून संस्थेद्वारा १९९८ ला शिवरामजी मोघे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली.परिसरातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना कला,साहित्य,उद्योग,व्यापार,विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये यश संपादन करून आपला विकास साधता यावा,या संवेदन उर्मीतून हे महाविद्यालय सुरु करण्यात आले आहे..

जागतिकीकरणाच्या या स्पर्धात्मक युगात संपूर्ण जग ग्लोबल झाले आहे. काळाची गरज आणि संगणक अभ्यासाचे महत्व लक्षात घेता वाणिज्य शाखेमध्ये सुसज्ज असा अद्ययावत संगणक कक्ष सुरु करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी महाविद्यालयात अभ्यासक्रमासोबतच अभ्यासेतर उपक्रम राबविले जातात. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन महाविद्यालयात केले जाते .एकूणच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण आणि संपूर्ण विकास व्हावा, हि या मागची भूमिका आहे.

महाविद्यालयाच्या विकासाकरिता प्राचार्य,सर्व प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी सातत्याने झटत असतात. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल याशासास्ठी आम्ही प्रयत्नशील आहोतच.आमच्या प्रयत्नात विशेषतः विद्यार्थी आणि पालक तसेच नागरिकांचेही सहकार्य अपेक्षित आहे.

image

मा.विजय मोघे

सचिव

श्री.विनायक बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था,

दिग्रस , जि.यवतमाळ