श्री विनायक बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था , दिग्रस द्वारा संचलित
शिवरामजी मोघे
कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
केळापूर ( पांढरकवडा ), जि. यवतमाळ - ४४५३०२

प्राचार्यांचे मनोगत

महाविद्यालयाची स्थापना १९९८ ला झाली असून आमचे महाविद्यालय प्रगतीपथावर आहे.महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थी प्रवेश घेतात.विद्यार्थी हा केंद्र बिंदू असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्याची परंपरा महाविद्यालयाने जोपासली आहे.अभ्यासक्रमासोबतच अभ्यासपूरक उपक्रमाचे आयोजन महाविद्यालय करीत असते. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळावी हा एकमेव उद्देश समोर ठेवून महाविद्यालयात विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थी जीवनात यशस्वी कसा होईल त्याकरिता प्रत्येक विषयाचे विषय-तज्ञाकडून योग्य मार्गदर्शन दिले जाते.

समाजजीवनात आदर्श निर्माण करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. राष्ट्रीय सेवा योजना तसेच विद्यार्थी छात्र संघाच्या माध्यमातून कार्यशाळा, शिबीर,संगणक प्रशिक्षण, इंग्रजी संभाषण अशा प्रकारचे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारे वर्ग महाविद्यालयाच्या वतीने निशुल्क घेतले जातात. पर्यावरण जनजागृती, मतदार जनजागृती तथा शासनाचे सर्वेक्षणाचे कार्य इत्यादी राष्ट्रीय कार्यक्रमात महाविद्यालय नेहमीच अग्रेसर असते. काळाची गरज लक्षात घेता शिवाजीराव मोघे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक केंद्र स्थापन केले आहे. महाविद्यालयातील विविध अभ्यासमंडळाद्वारे लेखन,संभाषण,वक्तृत्व अशा प्रकारच्या कौशल्यांना चालना देणारे उपक्रम राबविले जातात. तसेच महाविद्यालयाचा वार्षिक अंक नियमितपणे काढला जातो. महाविद्यालयाच्या विकासासाठी व्यवस्थापन मंडळाच्या मार्गदर्शनासोबतच सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांचे बहुमोल सहकार्य मिळत आहे. आपणा सर्वांच्या सहकार्यातून महाविद्यालय प्रगती पथावर वाटचाल करीत आहे.

image

मा.डॉ.शंकर राजेश्वर वऱ्हाटे

प्राचार्य

शिवरामजी मोघे महाविद्यालय

केळापूर पांढरकवडा , जि.यवतमाळ